मन, आत्मा आणि समाधान...!
मन,आत्मा आणि समाधान...! ह्या जगात जर सर्वात वेगवान गोष्ट कोणती असा प्रश्न पडला असेल..!🤔तर मग काहींच्या दृष्टीकोणाच्या मते त्याच उत्तर काहिही असू शकतं..🤷🏻♂️ पण माझ्या मते ह्या जगात जर सर्वात वेगवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणसाचं मन ...तर ह्याचा प्रश्न पडला असेल की मनच का..? बाकीच्या गोष्टी पण आहेतच की..! ही झाली पहिली बाजू पण; दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्याचंही उत्तर असू शकतं की मनच....म्हणजे बघा ना अगदी कधीही आपल्याला कुठेही कल्पना करायची म्हणल तर सर्वात आधी आपलं मन तिथे पोहोचतं. आणि नंतर आपल्या कल्पना शक्ती दाटून येतात. पण मन ही एक भावना असून त्याला आपण एका विशिष्ट गोष्टीचा दर्जा दिलाय. आता ह्याच भावनेच्या भरात आपण अगदी काहीही बोलून जातो किंवा एखाद्या ला दुखवू व शकतो व भावनेला मनात साठवूही शकतो, कारण....! मन ही एक आनंद आणि दुःख व्यक्त करण्याची जागा असते. आपण बोलतो बघा मन हलकं झालं, मनाला बरं वाटलं इ.पण समजा कदाचित तेच जर मन कुणी दुखवलं तर...? त्रास तर होतोच ना. मग त्याच मनाची आपण समजूत घालतो आणि पुढे चालतो. पण कधी कधी अशीही वेळ येते की मन तयारच होत नाही एखाद्या गोष्...