दुःखाची व्याख्या...😉

दुःखाचं मानवी आयुष्यातील स्थान काय...?
         स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यातील दुःखांचा वेध घेता घेता एक गोष्ट नेहमी जाणवत आलेली आहे.दुःखाला आपल्या आयुष्यात निश्चित एक महत्त्वाचं स्थान आहे.अंधार आहे म्हणून आपल्याला प्रकाशाची किंमत कळते.गुलाबाचं फुल हातात अलगदपणे नेमकं कुठे धरायचं ते काटे आपल्याला शिकवतात.सुखाची चव गोड असते परंतु दुःखाची चवच महत्त्व सांगून जाते.सुख आणि दुःख ह्याच्या प्रकृती मुळातच वेगळ्या आहेत.सुखाची गंमत क्षणिक असते, आणि ती वरवरची असते,म्हणून आपण सुखाचा हव्यास धरून असलो तरी त्यातून आपण फारसं शिकत नाही.दुःख मात्र खोलवर जातं.अंतर्मनात ते बराच काळ राहतं.तिथे ते मनात घर करून परिणाम करतं.म्हणूनच आपल्याला बदलायला लावण्याची ताकत दुःखात असते,आपल्या आयुष्यात येणारी लहान-मोठी दुःखं आठवून पहा:-परीक्षेतलं अपयश,आर्थिक नुकसान,जवळच्या व्यक्तीचा मृत्यू,प्रेमात एकमेकांशी न पटल्यामुळे विभक्त होणं,आजार,अपंगत्व आणि अशे बरेच कितीतरी..
        
        या प्रसंगांमध्ये आपण वरवर पाहता निष्क्रिय झालेलो दिसत असलो,तरी तेव्हा आपण अंतर्मुख झालेलो असतो, म्हणजेच स्वतःच्या जवळ आलेलो असतो.झालेल्या प्रसंगाला तोंड देताना नवीन पावलं उचलावी लागतात,नवीन भूमिका बजावावी लागते.या प्रसंगातून सावरताना एका वेगळ्याच उर्जेनिशी आपण बाहेर येतो.आपण निश्चितपणे बदलेलो असतो.दुःखात शिकवण्याची ताकत आहे हे जरी खरं असलं तरी,शिकण्याची आपली किती तयारी आहे यावर सर्व अवलंबून असतं.हे प्रसंग हाताळताना अनेकदा आपला अहंकार आड येतो..

        परीक्षेचा अभ्यास नीट न झाल्यामुळे नापास झालेला एक विद्यार्थी "आपलं कुठे चुकलं" हा विचार न करता करता केवळ परिक्षपद्धतीला,नशिबाला किंवा देवाला दोष देत बसतो.नाहीतर "मी कमीच आहे",मला अभ्यास जमणारच नाही' हे रडगाणं करत बसतो.दुःखातून कधीतरी बाहेर यायचं आहे ही जाणीव हळूहळू कमी होते.आणि दुःख हा स्थायी भाव होऊन बसतो....
                                                         To Be Continued.....☺️

@Pratik.45_✍️

Comments

Popular posts from this blog

मन, आत्मा आणि समाधान...!

"स्टेटस"

इगो आणि सेल्फ रेस्पेक्ट