मन, आत्मा आणि समाधान...!

मन,आत्मा आणि समाधान...!

ह्या जगात जर सर्वात वेगवान गोष्ट कोणती असा प्रश्न पडला असेल..!🤔तर मग काहींच्या दृष्टीकोणाच्या मते त्याच उत्तर काहिही असू  शकतं..🤷🏻‍♂️ पण माझ्या मते ह्या जगात जर सर्वात वेगवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणसाचं मन...तर ह्याचा प्रश्न पडला असेल की मनच का..? बाकीच्या गोष्टी पण आहेतच की..! ही झाली पहिली बाजू पण; दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्याचंही उत्तर असू शकतं की मनच....म्हणजे बघा ना अगदी कधीही आपल्याला कुठेही कल्पना करायची म्हणल तर सर्वात आधी आपलं मन तिथे पोहोचतं. आणि नंतर आपल्या कल्पना शक्ती दाटून येतात. पण मन ही एक भावना असून त्याला आपण एका विशिष्ट गोष्टीचा दर्जा दिलाय. आता ह्याच भावनेच्या भरात आपण अगदी काहीही बोलून जातो किंवा एखाद्या ला दुखवू व शकतो व भावनेला मनात साठवूही शकतो, कारण....! मन ही एक आनंद आणि दुःख व्यक्त करण्याची जागा असते. आपण बोलतो बघा मन हलकं झालं, मनाला बरं वाटलं इ.पण समजा कदाचित तेच जर मन कुणी दुखवलं तर...? त्रास तर होतोच ना. मग त्याच मनाची आपण समजूत घालतो आणि पुढे चालतो. पण कधी कधी अशीही वेळ येते की मन तयारच होत नाही एखाद्या गोष्टीचा स्वीकार करायला. पण नाईलाजाने आपल्याला ते करावाच लागत.आणि काहीवेळ त्याला दुसरा पर्याय पण नसतो.मनाला आपण साध्या भाषेत आत्मा असाही उल्लेख करतोच. काहीवेळा असं वाटतं की बाहेर काढावा तो भुतासारखा गुप्त आणि भटकलेला आत्मा आणि टांगून टाकावं कुठंतरी पडझड झालेल्या वाळलेल्या कुठल्यातरी निरुपयोगी झाडाला...!! मारावं फेकून आपल्या अपेक्षा, स्वप्न आणि जबाबदऱ्याचे मोठे दगड आणि पहावा बरं..! निघतात का त्याच्यातून रक्ताचे थेंब कसल्या तसल्या अवस्थेमधून. नाही निघणार ना..? कारण आपल्याला ही माहिती आहे. मन आणि आत्मा ही एक फक्त भावना आहे. शरीरात लपून रुतलेल्या काट्याच्या वेदनांना सहन करत हरवलेल्या मनाला आणि त्याला रडता ही येत असेल नसेल माहिती नाही. पण त्याला ही क्वचितच वाटत असेलच की मुक्त व्हावं ह्या रोजच्या रडगाण्यातून, सगळ्या विद्रुप मायावी जगाच्या सावलीतून....! 
शरीराला जखमा भरतात पांढरे सदरे घातलेली सजीव लोकं पण आत्म्याचा सुरू असलेला अविरत अशांततेचा रक्तप्रवाह थांबवणारी जादूची यंत्रणा कुठे असेल देव जाणे. सगळ्यांच हसणं सारख  चेहरे वेगळे, डोळ्यातली थेंब सारखी दुःख वेगळी, दुःख सारखी तर कारणं वेगळी, अपेक्षा, स्वप्न सारखी तर माणसं वेगळी,ह्या वेगळेपणाच्या दुनियेत सगळं सारखं असलं तरी सगळ्यांना कायम जगापेक्षा वेगळं वाटत आलंय. कोणाचं वर्तुळ पैश्याने मोठं तर प्रेमाने लहान, कोणाचं प्रेमानं मोठं असलं तरी पैशाने लहान, कोणाच्या वर्तुळात दुःख मोठं असल्याचं तर कोणाच्या वर्तुळात सुख नसल्याचं, ज्याच्या वर्तुळात शुन्य आहे त्याच स्वप्न एक बनण्याची तर ज्याच्या वर्तुळात एक आहे त्याचं शंभर स्वप्न जगवण्याची.कोणी एक सजीव ज्याच्या त्याच्या वर्तुळात शांत,सुखी,निरस नाही. सगळी जनावरं लहान-मोठ्या वर्तुळात फिरत असली तरीही, आत्म्याचा आकार कुठं कोणाला कळलाय ? तो आपला सगळं पहात एकटाच लुप्त होत असतो. स्वतः च्या वेगळ्याच दुनियेत जिथं माणसाची मायावी आयुष्यची मूळ रुजलेली असावीत. माणूस जगाला खोटं बोलत असला तरीही तो स्वतः च्या आत्म्याला खोटं बोलेल एवढा धुरंदर कधीच बनू शकला नाही. आणि हा माणसाचा पराभव आणि आत्म्याचा विजय असावा अस मला तरी वाटतं. न्यायालय कुठलं ही असलं तरी सगळ्याचा न्यायाधीश म्हणजे आत्मा/आपलं मन. त्याला मात्र सत्य आणि सगळं खरं माहिती असावं नक्कीच..! सुख, दुःख, प्रेम, स्वप्न, जबाबदाऱ्या, पैसा, गाडी, बंगला, नाती, अपेक्षा, सुंदरता, मोह ह्या सगळ्या या भाबड्या शरीराच्या मागण्या..! मन/आत्मा ह्यातलं काहीच मागत नसलं तरी माणूस अहोरात्र धावत असतो. तो ही ह्यातल्याचा एका देवाला प्रसन्न करण्यासाठी. आणि देव नाही भेटला की शिक्षा तर हमखास भेटते. त्या मनाला मुक्त न होता तुरुंगात शेवटपर्यंत सडत राहण्याची. 
खरंच हे शरीर अपराधी की मनाला राजा बनून देत असावं..?
कठोर आज्ञा त्याच्या शरीर गुलामाला...✨
.
.
.
.
.
.
प्रतिक पालकर_✍️

Comments

Popular posts from this blog

"स्टेटस"

इगो आणि सेल्फ रेस्पेक्ट