इगो आणि सेल्फ रेस्पेक्ट

जेव्हा एखादा माणूस चुक करतो आणि तुमच्या समोर माफी 
मागण्या ऐवजी तुम्ही कसे चुकीचे आहात सांगत असेल,आणि 
झालेली चूक तुमच्या अंगलट घालत असेल तर त्याला इगो म्हणतात😒,
आणि त्याच परिस्थिती मध्ये ज्याने चूक केलीली नसेल तरीही प्रत्येक वेळी
सॉरी सॉरी बोलत असेल आणि सॉरी बोलून जेव्हा सहन
करण्याच्या पलीकडे जातं त्यावेळी तुम्ही तुमची नसलेली चूक कबूल
नाही करत त्याला सेल्फ रेस्पेक्ट म्हणतात...🤗 ह्यातच मग एवढ्या तेवढ्या कारणांमुळे नात्याला तडा जातो आणि दुरावा निर्माण होतो,त्यावेळी कोणीही मध्यस्थी केली तरीही आपली चूक असून सुद्धा आपण मान्य करायला तयार होत नाही कारण तेव्हा च्या क्षणी आपली सहन करण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली असते😳.अश्यावेळी ह्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या एकदम खास मित्रांशी बोलणे किंवा गप्पा मारणे,निदान कमीत कमी
त्यांच्या आवर्जून दोन शिव्या तर खाणे.आता तुम्ही म्हणाल की ह्याने काय होतं..?🤔 तर आपल्या आवडत्या व्यक्तीशी गप्पा मारल्या की असलेलं ओझं कमी होतं आणि नाहीच झालं तर तेवढ्यापुरतं मनाला समाधान तरी मिळतं.(असं माझं मत आहे😉)

प्रत्येक माणसाला माहिती असतं की आपण बरोबर आहोत की चुकीचे,
जगासाठी तुम्ही बरोबर असालही पण स्वतःच्या नजरेत चुकीचे असता😇आणि बऱ्यापैकी रिलेशन ही इगो मुळेच संपतात🤕,इगो
माणसाची विचार करायची क्षमता कमी करून त्याला मूर्खा
सारख वागायला भाग पाडतो,पण तुम्हाला समजत पण नाही की तुम्ही
तुमच्या अहंकारामुळे तुमच्या आयुष्यातील किती किंमती 
लोकांना गमावून बसलात..🤒तुमच्या इगो ला स्वतःची ताकत नका
 समजू जेणेकरून तुम्ही कोणाशी कसं वागताय हेच तुम्हाला दिसायचं
बंद होईल नाहीतर एक दिवस जेव्हा पाठ फिरून बघाल
तेव्हा कोणीच तुमच्या सोबत नसेल....🤐
मग त्यावेळी पश्चात्ताप करण्यापलीकडे आपल्या हातात 
काहीच राहणार नाही,म्हणून वेळेवर भानावर येणं गरजेचं असतं😕,
नाहीतर कधी कधी आपण सहज बोलून जातो पण शब्दांच्या कठोर शस्त्रांमुळे समोरच्या मनाला लागून तो कायमचा दुखावला जातो..😓
म्हणून योग्य त्यावेळी इगो आणि सेल्फ रेस्पेक्ट ला कुठे महत्व द्यावं हे कळलं पाहिजे...🙏


@Pratik.45_✍️



Comments

Popular posts from this blog

मन, आत्मा आणि समाधान...!

"स्टेटस"