"स्टेटस"
स्टेटस....!
"स्टेटस" अगदी ज्यावेळी पहिल्यांदा हा शब्द ऐकलं त्यावेळी काय लक्षात आलं..? अर्थातच व्हाट्सअँप स्टेटस.😅 काय नक्की कशासाठी ?🙄 आणि कुणासाठी ?🤔 ठेवायचं.तर आजकाल उठ सूट काहीही स्टेटस ला बघायला मिळतं,मग काहीजण ते बघत पण नाहीत आणि पुढे पुढे ढकलू लागतात.तर का की त्या स्टेटस काहीही अर्थ नसतो आणि बघण्यात फुकटचा वेळ वाया जातो😪 म्हणून,तर स्टेटस हे एक छंद,आवड,मनोरंजन किंवा आपल्या भावना थोडक्यात सगळ्यांना काळाव्या ह्यासाठी ठेवायचे असतात.😃न की लोकांना इंप्रेस करण्यासाठी किंवा स्वतःचा खोटा मोठेपणा मिरवण्यासाठी.स्टेटस जरूर ठेवा पण ठेवताना एका गोष्टीचं भान असावं की त्यामागचा उद्देश आणि भावना महत्त्वाच्या असतात.👏त्यामुळे सुंदर स्टेटस जरूर ठेवावं पण हे ठेवण्यासाठी चुकीच अस काही करू नये.नाहीतर आजकाल दुसऱ्याचे कॉपी करून त्याच नाव खोडून Share करण्याची वाईट सवय लोकांना लागलेली असते.😂अगदीच त्यापुढे ही जाऊन तर धमकी वजा स्टेटस बघायला मिळतात,काहीजण तर वेळोवेळी आपली स्वतःची Update देतात उदा. Way To..,Eating Something,@जागेचं Location etc etc🤐त्यामुळेच काहीजण वैयक्तिक बघायला टाळाटाळ करतात आणि कधी त्या म्युट पर्याय मध्ये जाऊन बसतात कळत देखील नाही.आणि कधी काळी तेच लोकं पर्याय म्हणूनच तो स्टेटस बघू लागतात एका रिकाम्या वेळेत.मुळात असं करून काहीच मिळत नसतं,कितीही सुंदर स्टेटस ठेवलं तरीही लोकं फक्त पाहतात आणि सोडून देतात.पण ते स्टेटस ठेवण्यामगाचा उद्देश लोकं काय घेतील किंवा ते बघितल्यानंतर ते कसे रिऍक्ट होतील हे जर आपण समजू शकलो तरच ते व्हाट्सअँप ठेवलेलं सार्थ ठरू शकतं.आणि तसही "स्टेटस" म्हणलं की अजुन एक आपल्या मनात प्रतिमा उमटते ती म्हणजे आपला वैयक्तिक स्टेटस,😎आणि ह्याच स्टेटस ची किंमत काहीवेळेस आपला व्हाट्सअँपचा स्टेटस ठरवून जातो.ती एक चारोळी आठवत असेलच 👉"ज्याचं अक्षर सुंदर,त्याचं मन सुंदर,"👈 अगदी तसंच आपल्या वैयक्तिक स्टेटस वर त्याची छबी पडू शकते...!! आणि काही लोक असेही असतात खास करून आपले नातेवाईक,जे की भेटल्यावर बोलून दाखवतात आणि त्यानुसार आपल्याला Judge✔️देखील करतात.त्यापलिकडेही दुसरी बाजू बघायची म्हणलं तर आपलं रिअल स्टेटस काय आहे..? हे आपल्या आजूबाजूच्या लोकांना,रोजच्या संगतीतल्या मित्रांना माहिती असतं.त्यामुळे अस खोटं आतून एक आणि बाहेरून एक अस दाखवण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगला आहे ते इतरांना Share करत चला जेणेकरून स्वतःला ही समाधान🤗 मिळेल की मी माझ्यासाठी,लोकांसाठी आणि समाजासाठी काहीतरी चांगलं केलं तसंच बघणाऱ्याला समाधान वाटेल की खरंच हा माणूस खूप चांगला आहे.😉आणि काहीजण तर आवर्जुन स्टेटस बघतील की आज काय नवीन शिकायला मिळेल.हे ज्यावेळी आपल्या स्वतःला समजेल त्यावेळी आपल्या खऱ्या स्टेटस ला काही डाग लागणार नाही ह्याची खात्री १००% ✅आपल्यालाच बसेल.जस आपण व्हाट्सअँप स्टेटस ठेवतो तसंच जर आपलं वागणं आणि जगणं सुद्धा तेवढंच इमानदारीच असलं पाहिजे. कारण अशावेळी आपला समाज आपल्याकडे किती चांगल्या दृष्टीने बघतोय हे सुद्धा समजून जाईल.🥰आणि इमानदारीने जगण्यात जी माणुसकी आहे त्याची मजा काही वेगळीच आहे...💖
-प्रतिक पालकर✍️
Comments
Post a Comment