तिन्हीसांजेचा स्पर्श...

मागच्या भागातल्या रात्री च्या वर्णन करण्याचा थोडासा भाग राहिला होता,
काही कारणांमुळे तो करता आला नाही त्यामुळे आज आपण तो करण्याचा प्रयत्न करू आणि आज शेवट सुध्दा करू.

दबून अगदी मेलेल्या स्वप्नांना ही ती नाकारत नाही ...
त्यांना आपलंसं करून शांत ठेवते...
दिवस चुका घडवतो फक्त,रात्र त्या चुकांना सुधारण्याचा विचार 
देऊन जाते...
दिवस वार करत राहतो,रात्र आधार देऊन जाते...
या असंख्य ओळखी-अनोळखी पात्रांच्या नाटकात 
'ती' आणि 'मी' 
मात्र एकमेकांना सर्वात जवळची वाटणारी रोजची बेधुंद "रात्र"...

मी ही एकटा आणि ती ही एकटी...दोघांना एकमेकांशिवाय बाकी कोणाचीही 
गरज नाही असं मला वाटतं...
माझ्या सगळ्या भावना, वेदना, प्रश्न या सगळ्यांना
या जगात प्रेमानं कुशीत फक्त रात्र च घेते...
बाकी सगळ्याच जणांनी मला अगदी सहज लाथडलं आहे
रात्रीनं मला हवं तसं स्वीकारलं आहे...
म्हणूनच मी "निद्राशतरू"...!
मला माझ्या एकटेपणा मध्ये तटस्थ उभा राहून 
साथ देणाऱ्या त्या "रात्रीला" माझ्या एकमेव जोडीदाराला मला निद्रेत जाऊन 
एकटं सोडायचं नाही आहे...
काही क्षणांसाठी का असेना पण माझी माझ्याशी 
ओळख करून देणाऱ्या तिला मला असं वाऱ्यावर सोडून स्वतः 
झोपेत रममाण व्हायची भिती वाटते...

म्हणून च आतापर्यंत त्या रात्रीशी कधीच बेईमानी नाही करू वाटली,
जीने आपल्या दुःखाला रडायला जागा दिली, 
आनंद साजरा करायला मनोमन आपलंसं केलं ..!
मुख्य म्हणजे एका रात्रीत आपण जग बदलू शकतो हे तिने शिकवलं..😉
      
                                                            समाप्त:✍️

Comments

Popular posts from this blog

मन, आत्मा आणि समाधान...!

"स्टेटस"

इगो आणि सेल्फ रेस्पेक्ट