दुःखाची व्याख्या...😉

                दुःख ही एक 'नॉर्मल' भावना म्हणून येते, तेव्हा ती एखाद्या लाटेसारखी असते.ती येते आणि ओसरतेही.पण काही वेळा काही माणसांची मन:स्थिती सतत दुःखी राहते.हे दुःखं त्यांना सगळीकडे जाणवतं घरी, कामाच्या ठिकाणी,मित्रमंडळी मध्ये देखील.या मन:स्थिती मुळे त्याच्या कार्यक्षमतेवर आणि नातेसंबंधावर परिणाम होतात आणि एकूणच आयुष्याची गुणवत्ता खालावते.त्यावेळी ते नुसतं दुःख नसतं.तो असतो 'नैराश्य' नावाचा मानसिक आजार.
           
               आपल्या आयुष्यातील कृष्ण-छटा.काही फिकट तर काही गडद. काही सौम्य राखाडी तर काही भीषण काळ्या-अंगावर येणाऱ्या,काहीही असलं तरी एक गोष्ट नक्की.या छटा प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ आहेत.त्या स्वीकारून जो पुढे जातो तोच आनंदात असतो. आनंदी माणूस म्हणजे दुःख नसलेला मनुष्य नव्हे, तर दुःखालाही आनंदाने आपलंसं करणारा माणूस. कृष्ण-छटा स्वीकारून आनंदाने जगणं म्हणजे खरा अर्थ होतो. देव मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने हे सर्व मी एका गोष्टीवर श्रद्धा ठेवून लिहितो आहे. अंधारा भुयारा च्या शेवटी प्रकाश हा असतोच. मग ते भुयार कितीही लांबलचक का असेना....! दुःख हे मुळात बघायला गेलं वाईट नसतं,कधी कधी त्याच दुःखातून आपल्याला परिस्थितीशी दोन हात करायची संधी मिळते. पण त्या संधी सुद्धा आपण त्याला सामोरं जातो की त्या दुःखाला घाबरून त्याच्या पळ वाटा शोधू लागतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. जेणेकरून त्या परिस्थितीतही आपलेपणाची माणुसकी दिसू लागते,म्हणजे त्यावेळी आपल्या सोबत गोड बोलणारे किती आणि मदत करणारे किती ह्याची खरी आत्मीयता समजते. 
                 
               जसं की श्रीकृष्णाने सुद्धा त्याकाळी एक सुंदर वाक्य म्हणलं होतं,
"ही वेळही निघून जाईल" म्हणजे दुःखात सुद्धा आनंद होईल आणि आनंदात सुद्धा दुःख होईल. म्हणून आलेल्या संकटांना दुःख न समजता परमेश्वराने आपल्यावर नव्याने दिलेली जबाबदारी समजायची,आणि आपण आपलं कर्तव्य बजावत राहायचं. आणि त्या कर्तव्याची परतफेड म्हणून तो वर बसलेला सगळयांचा हिशोब ठेवत असतो. पण हे सगळं सहन करण्याची प्रत्येकाची कुवत नसते. काहीजण त्या दुःखाला लांबूनच नमस्कार करून तिथूनच मार्गाला लावतात.
               
                दुःखात शिकण्याची ताकत आहे.हे जरी खरं असलं तरी,
       शिकण्याची आपली किती तयारी आहे ह्यावर सगळं अवलंबून असतं.❤️


@Pratik.45_✍️

Comments

Popular posts from this blog

मन, आत्मा आणि समाधान...!

"स्टेटस"

इगो आणि सेल्फ रेस्पेक्ट