तिन्हीसांजेचा स्पर्श...
चला तर काही काळासाठी मनाला धुंडारून मनसोक्त जगायला काहीतरी कारण मिळालं, म्हणजे नेमक्या मूळ कारणासाठी ची रात्र आजकाल एकदम जवळची वाटू लागली, स्वप्नातल्या सहवासातली, मनमोकळ्या करणाऱ्या मित्राची जागा घेतली. आणि कळून सुद्धा दिले नाही ...
"रात्र फक्त खऱ्या अर्थाने आपली असते..
आपला सगळ्यात विश्वासहार्य' जोडीदार'
दिवस साल मात्र हरामखोर ...फक्त दुसर्यासाठी अतोनात पळायला लावणारा आणि शेवटी सगळं तुमच्याच साठी आहे वेड्या,म्हणून भूल देणारा...
"थकणं" हा शब्दच याच्या शब्दकोशात नाही आणि असलाच
तर त्याच्याशी याचं काही देणं लागत नाही...
रात्र मात्र अगदी काळजी करणारी...
अगदी आईप्रमानं...
' मी थकलोय ' अस तिला अजिबात सांगायची काही
गरज नाही ...ती आपोआप सगळं समजून
या स्वार्थी जगापासून काही काळासाठी एकदम शांत
आणि दूर नेऊन ठेवते ...जिथं आपला फक्त आपल्याशी संबंध असतो...
ती आणि आपण सोडून कशाचाही
त्यात व्यत्यय नाही ...
" रात्र " आकाशात स्तब्ध चांदण्याना आपल्या ही हातातून
नकळत निस्टलेल्या ताऱ्यांची पुन्हा आठवण आणि मोजणी करून देते ...
स्पदनांच्या आवेगांना स्वैर करून त्यांना बेधुंद त्यात बागडायला लावते ...
जबाबदाऱ्यांच्या आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली
कुठतरी सहज दबल्या गेलेल्या स्वप्नांना '
परत एकदा प्रयत्न कर ' अस सांगून नवी उमेद जागी करते...
--क्रमशः
@Pratiks_Poetry✍️
Comments
Post a Comment