दृष्टीकोन की परिस्थिती..?😉
सध्या ची चालू घडामोडी पाहता कोरोनाने होऊ घातलेल्या थैमानाने सध्या जग हळूहळू सावरत चाललं आहे😞.काही देशांमध्ये तर त्याच्या लस ही उपलब्ध झाल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्या लस देण्याचे कामही आपापल्या देशांमध्ये चालू आहे😉. काही गोष्टी लक्षात घेता ह्या Lockdown मुळे बऱ्याच जणांच्या नोकऱ्या, व्यवसाय, छोटे-मोठे गृहउद्योग बंद पडले,😕अश्या अवस्थेतच काहीजणांवर उपासमारीची वेळही उद्भवली पण त्याही प्रसंगावर मात करून आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत😖.
कोरोनामुळे अनेक जणांचे म्हणजे थोडक्यात आपल्याच माणसांचे खरे रंग पाहायला मिळाले तेही अगदी जवळून.म्हणजे स्पष्ट बोलायचंच झालं तर अस म्हणेन की काही माणसं वेळेनुसार बदलली तर काहीजण स्वतःच्या स्वार्थानुसार बदलली😒.पण ह्यांना बदलण्यामागचा कारणीभूत कोण ? आपण की हा कोरोना.? अर्थातच ह्याच उत्तर माझ्याकडे पण नाहीये😖.पण माणूस बदलला आहे ह्यात तिळमात्र शंका नाही.ह्याच कारण शोधलं तर असं स्पष्टपणे सापडलेच अस नाही.माणूस बदलला कारण मानलं तर तो स्वतःला शहाणा समजू लागला,बघितला तर त्याच्यात Attiude दिसू लागला,😎समजला तर तो एकटे राहणं पसंत करू लागला, जाणवलं तर अबोल राहू लागला,आणि अनुभवलं तर माणसात राहणं आवडू लागलं.ही झाली एक बाजू.कधी कधी कळत नकळतपणे आपण बोलता बोलता एखाद्या अगदी जवळचा होऊन जातो.☺️असं आपल्याला वाटतं.!पण तेवढंच जवळचा समोरचा आपल्याला समजेलच अस नाही ना..?🙄म्हणूनच जो योग्य वेळी माणसं ओळखायला शिकला तोच आयुष्यात यशस्वी होतो अशी म्हण आहे.पण ही म्हण कितपत योग्य वाटते ?कारण मला ही पूर्णतः नाही पटलेली.😏हे झालं माझं मत.मग समोरच्या बद्दल आपल्याला सहानुभूती किंवा आपुलकी वाटू लागते.आपण त्याला सगळं सांगतो म्हणजे त्यानेही आपल्याला त्याची सगळी गुपितं आपल्याला सांगावीत असं वाटू लागतं पण सहसा तस होत नाही. गरजेचं नाही की आपण जेवढं समोरच्याला महत्त्वाचं समजतो तेवढंच त्यानेही आपल्याला तसच समजावं.आणि आपणही त्यांच्याकडून तशी आपण अपेक्षा करणं ही चुकीचंच आहे.असो..!🤗ह्या एवढ्याशा गोष्टी वरून आपण मग त्याचं वागणं ठरवतो.नको नको ते विचार करू लागतो,हा असाच आहे तो तसाच आहे.अगदी तुच्छ पातळीपर्यंत आपले विचार जायला लागतात.आता ही झाली दुसरी बाजू.आता इथं प्रश्न हा पडतो की त्याने आपल्याला सांगितल नाही म्हणून तो वाईट की आपण त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या हे वाईट..?😔तर ह्याचं उत्तर अस असेल की आपण त्याच्याकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या.कारण समोरच्याने एखाद्याला किती जवळ करावं हा वैयक्तिक त्याचा प्रश्न आहे.आणि तसंही एखाद्या कडून जास्त अपेक्षा ठेवल्या की त्याचा त्रास आपल्यालाच होतो.😃मग आता आपण हे ठरवायचं की किती कुणाला जवळ करायचं.आणि हेच खरं आहे.जाता जाता एवढंच सांगेन की माणूस बदलला म्हणजे त्याच्या सवयी बदलल्या नाहीत तर बदलला आहे तो म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा बाकीच्यांचा दृष्टीकोण..!🤔आणि जर तुम्हाला वाटत खरच वाटत असेल की तो बदलला आहे,तर त्याला परिस्थितीने बदलायला भाग पाडले👈असेल असंही होऊ शकतं..✍️
नाती बनवताना 💖अशी बनवा
की ती तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत
तुमच्या सहवासात राहातील,😉
कारण जगात❤️प्रेमाची कमतरता
नाही,कमतरता आहे ती फक्त
नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या
खऱ्या व्यक्तींची..😥✍️
Comments
Post a Comment